Friday 13 July 2012

पेशव्यांचे सरदार होळकर?

 या ब्लॉगची निर्मिती करण्याचा मुख्य हेतू हा होळकरांचा पराक्रमी इतिहास जगासमोर आणणे आहे जो कि जातीयवाद्याच्या कारणाने अथवा अन्य कारणाने आतापर्यंत लपवून ठेवण्यात वा विकृत करण्यात आला होता.
  होळकरांची ओळख हि सहसा पेशव्याचे सरदार म्हणूनच नोंद आपल्याला इतिहासात पाहायला मिळाली आहे. पण तसे  पाहायला गेले तर मल्हाररावानंतर कुणालाही पेशव्यांकडून सभेदारकिचे वस्त्रे देण्यात आली नाहीत. त्यामुळे होळकरांना पेशव्यांचे सरदार म्हणणे तांत्रिकद्ष्ट्या चुकीचे ठरते.

  ज्या प्रमाणे आदिलशाहीच्या सरदारकीपासून अलिप्त होऊन भोसलेनी स्वताचे वेगळे राज्य निर्माण केले, ज्या प्रमाणे पेशव्यांनी भोसलेंना कमजोर बनवून स्वत राज्याचे मालक बनले अगदी त्याच प्रमाणे होळकरहि पेशव्यांपासून अलिप्त झाले होते आणि स्वताचे वेगळे राज्य चालवत होते आणि त्याचबरोबर स्वताची वैयक्तिक राजमुद्रा निर्माण केली व चलने जारी केले. जे कि शिंदे, गायकवाड व पवार करू शकत नव्हते.

  पेशव्यांविरुद्धचे होळकर राजकारण नेमके केंव्हा सुरु झाले?
 खंडेराव होळकर यांचे इ.स. १७५४ मध्ये, कुम्हेरच्या सुरजमल जाटच्या विरुद्धच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यानंतर मल्हाररावाला सुरजमल जाटच्या विरोधात मदत करण्याऐवजी जाटचे रक्षण करणाऱ्या स्वार्थी शिंदेमार्फत पेशव्यांनी ६० लक्षाची खंडणी गोळा करून शिंदेना पाटीशी घातले. या क्षणापासूनच मल्हारराव होळकरांच्या पेशव्यांविरुद्धच्या राजकारणाला आरंभ झाला असे मानण्यास हरकत नाही.
  त्यानंतर अश्या अनेक गोष्टी होळकरांनी केल्या ज्या पेशव्यांच्या विरोधात होत्या. उदा. मल्हाररावांचे १७५८ सालचे "धोतर बडवे" पत्र,  आहिल्याबाईनी १७६७ साली पेशव्यांना घ्यायला लावलेली माघार असो वा १८०२ सालचे यशवंतरावचे हडपसरचे युद्ध व त्यात पेशव्यांचा अपमानास्पद पराभव. 
 
 ज्या प्रमाणे भोसलेना छत्रपती, पेशवेना श्रीमंत हि पदवी होती अगदी त्या प्रमाणे होळकराना सुद्धा महाराजा हि पदवी होती. माझ्या मते मराठेशाहीच्या इतिहासाचे तीन कालखंड आहेत. भोसलेकालीन इतिहास, पेशवेकालीन इतिहास व होळकरकालीन इतिहास...

- सचिन शेंडगे (९८६०३२४३८४)

3 comments:

  1. महाराष्ट्रा पुरते मर्यादित शिव-राज्य वाढवणारे ,शिव छत्रपतींचा इतिहास विश्वभर अजरामर करणारे होळ्करच होते राणोजी शिंदे या पेशव्यांच्या शिपायाला राजा बनवणारे होळ्करच होते. सबंध भारत भूमीवर राज्य करणारे होळकर हेच होते. जुलमी इंग्रजांचा धोका सर्व प्रथम ओळखून त्यांच्याशी युद्धपुकारून पराभूत करणारे होळ्करच होते.

    मुखी वर्णीता होळकरी शौर्य गाथा
    ...जन्म होई सार्थ तेव्हा ..

    महाराजा होळकर राजघराण्याचा गौरव शाली इतिहास आपण पुढे आणत आहात या बद्दल शतशःह आभार ...

    ReplyDelete
  2. मल्हारराव होळकरांना सुभेदारीची वस्त्रे देण्याचा प्रश्नच नाही. पवारांसोबत मल्हाररावांनी माळव्याचा निम्मा मोकासा मागितला होता आणि रतलाम सुभ्यातला निम्मा मोकासा पेशव्यांनी त्यांना करून दिला.. त्याबाबतची ही दोन पत्रे ‌:



    * लेखांक १)

    प॥ छ २७ रा॥वल
    संध्याकाल

    ॥ श्री ॥
    पु॥ अपत्ये अपत्ये चिमणाजीने कृतानेक नमस्कार उपरी. येथील क्षेम त॥ छ २६ रबिलोवल यथास्थित असे. पहिल्या तहनामियात पवारास मालवा तिजाई मोकासा होता त्याप्रमाणे आम्ही त्यास द्यावयास सिद्ध आहो. यैसे असता हाली त्यानी निमे मालवा मोकास द्यावा यैसा आड घातला आहे. त्यास सुभेदाराचेही विचारे त्यास निमे मालवा मोकासा द्यावा यैसे आहे. परंतू आमचे विचारास हे गोस्ट येत नाही. परंतू सुभेदारादेखता आम्ही स्वामींस पत्र लिहीले आहे त्याचे उतर पस्ट येक स्वामींनी ल्याहावे जे तिजाई मालवा जो पहिला मुकासा आहे त्याप्रमाणे हाली देऊ, जाजती देत नाही. आणि हवाला अगर येक रुपया नख्त द्यावयासी मिलत नाही यैसे ल्याहावे व पोकळ समाधानाच्या थोरपणाच्या गोष्टी ज्या लिहीणे त्या कागदात ल्याहाव्या. परंतू कारभाराचा जाब पष्ट ल्याहावा. तो त्यास दाखऊ व स्वामीचे विचारे निमे मालवा कबूल करावा यैसेच आले तर ते पत्र निरालेच आम्हास ल्याहावे. मग जैसा विचार बनेल तैसा करू. पैकीयाची गोष्ट तो स्वामींनी मान्य केलीच आहे. परंतू त्यास दाखवावयाचे पत्र ल्याहाल त्यात येक रुपया द्यावयास अनुकूल पडत नाही. यैसे ल्याहावे. ये गोस्टीचा विचार तात्यास बोलाऊन करणे. विचार तो करू उतर पाठवावे.

    माळव्याच्या मोकाशाबद्दल उदाजी पवारांनी चिमाजीअप्पांजवळ हट्ट धरला. त्यासंबंधी चिमाजीअप्पांनी बाजीरावांना या पत्राद्वारे कळवले. या पत्रात शाहूराजांनी पैशाची मागणी मान्य केली असली तरी पवारांना गर्व होऊ नये यासाठी त्यांच्या पत्रात त्यांना दाखवण्यासाठी 'रुपया द्यावयास अनुकूल पडत नाही' म्हणजे 'वास्तविक देणे हे रास्त नाही' असं सांगण्याचं अप्पा सुचवतात.

    संदर्भ : पेशवे दफ्तर खंड १३, लेखांक ५६

    यात पैवस्तीची म्हणजे पत्र पोहोचल्याची तारिख ही १० ऑक्टोबर १७२९ अशी सांगण्यात आली आहे. परंतू ती चूकून छापली गेली असावी कारण यापुढील पत्रातच, दि. २६ मे १७२८ रोजी बाजीरावसाहेबांनी पवार आणि होळकरांना चिमाजीअप्पांतर्फे माळवा निम्मा निम्मा वाटून दिल्याचे म्हटले आहे. वरील पत्रातील तिजाई म्हणजे एक तृतियांश हिस्सा, हवाला म्हणजे मुखत्यारी


    * लेखांक २)

    ॥ श्री ॥

    म॥ अनाम देशमुख व देशपांडे प॥
    रतलाम सुबे मालवा यांसी
    बाजीराऊ बलाळ प्रधान सुहूरसन तिसा अशरेन मया व अलफ. प॥ मजकूर पेशजीच्या मुकाशियाकडून दूर करून हल्ली चिमणाजी बलाळ यांजकडे दिला आहे. त्याणी आपल्या तर्फेने मुकासा वाटून दिला. बी॥ -

    राजश्री उदाजी पवार राजश्री मल्हारजी होळकर
    याजकडे प॥ ∙॥∙ याजकडे प॥ निमे ∙॥∙

    येणेप्रमाणे निमे निमे दोघाजणास मुकासा दिला आहे. तरी तुम्ही यांशी रुजू होऊन मुकास बाबेचा वसूल सुरळीत यांजकडे देणे. छ २७ सवाल आज्ञा प्रमाण.

    चिमाजीअप्पांनी आपल्या माळव्याच्या सुभ्यातील रतलाम परगण्याचा मोकासा उदाजी पवार आणि मल्हारराव होळकर या दोघांना निम्मा वाटून दिला त्याबाबत रतलाम परगण्याच्या देशमुख-देशपांड्यांना श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे दि. २६ मे १७२८ रोजीचे पत्र.

    संदर्भ : ले. ८७, साधनपरिचय महाराष्ट्राचा अर्थात महाराष्ट्राचा पत्ररुप इतिहास.

    त्यामूळे होळकर हे स्वतंत्र सुभेदार कसे झाले हे वेगळे सांगावयास नको.

    ReplyDelete
  3. ��⚒"प्राहोमेशालभ्या श्रीः कर्तुः प्रारब्धात्"��-प्रयत्नांती यश (राजमाता अहिल्यादेवीच्या कुलचिन्हातील अक्षरे)

    ReplyDelete