महाराणी शर्मिष्ठादेवी होळकर यांचे मूळ नाव नॅन्सी अॅन मिलर होते व महाराजा तुकोजीराव होळकर (तिसरे) यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांचा जन्म अमेरिकेत ९ सप्टे १९०७ साली झाला होता. त्यांच्या आईचे नाव जेनी मिलर व वडिलांचे नाव जॉन मिलर होते जे कि अनेक सोन्याच्या खाणीचे मालक असणारे अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती होते. नॅन्सी अॅन मिलर हे नाव जरी भारतात जास्त प्रसिद्ध नसले तरी अमिरिकेत आजही भारतीय महाराजाशी विवाह करणारी पहिली अमेरिकन तरुणी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा मृत्य १९९५ साली सुख निवास राजवाडा, इंदोर येथे झाला.
महाराजा तुकोजीराव युरोपच्या दौर्यावर असताना त्यांची आणि नॅन्सी अॅनी मिलर यांची भेट झाली. पुढे या भेटीचे
रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर तुकोजीराव यांनी विवाहाचा प्रस्ताव ठेवला. महाराज
अॅनीच्या प्रेमात इतके बुडून गेले होते की वेळ पडल्यास धर्म बदलायची तयारी पण त्यांनी केली होती. त्यावेळेस
तुकोजीराव यांनी नॅन्सी यांना भेट दिलेली हिऱ्याची जोडी ही जगातील
सर्वात सुंदर हिऱ्यापैकी एक होती. ती इंदूर पिअर्स या
नावाने देखील प्रसिद्ध आहे.
महाराजा तुकोजीराव होळकर हे आपल्या भावी पत्नीसह
भारतात परतल्यानंतर मात्र त्यांच्या विवाहास वधू ही एका ख्रिश्चन असल्यामुळे कट्टर
हिंद्त्ववादी असणाऱ्या अनेक जातीय संघटनांनी त्यास कडाडून विरोध केला. त्यामुळे हा
विवाह होण्याआगोदरच मोडतो कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. हिंदुत्ववादी
संघटनेचा विरोध पाहता काही मुस्लीम धर्मप्रचारक हे तुकोजीरावांच्या संपर्कात होते.
हिंदुस्तानातील सर्वात श्रीमंत असणारे हिंदू राजे मुस्लीम धर्म स्वीकारणार ह्या
बातमीने हिंदुत्ववादी संघटनानी जरा आवरत घेतले आणि नॅन्सी अॅन
मिलर यांनी जर हिंदू धर्म स्वीकारला तर विवाहाला आमचा विरोध राहणार नाही.
ह्या आंतरवांशिक विवाहाने जगभरातील
प्रसारमाध्यमांचे लक्ष्य वेधले, आणि जगभर सर्वत्र ह्या अनोख्या विवाहाची चर्चा
रंगू लागली. महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीतील प्रबोधनकार ठाकरे, डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांनी ह्या विवाहाचे समर्थन केले. यावेळी तुकोजीराव यांनी डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांना मदत मागितली. त्यानंतर बाबासाहेबांनी बारामतीस धनगर समाजाची परिषद
७-६-१९२८ रोजी भरविली. त्या लग्नास समंतीवजा ठराव पास केला.
पुढे ता. १३-३-१९२८ रोजी नाशिक येथे डॉ. कुर्तकोटी
शंकराचार्य यांनी मिस मिल्लर यांना हिंदू धर्माची दीक्षा दिली. व लम्भाते
कुटुंबियांनी तिला दत्तक घेऊन त्यांना धनगर करुन घेतले व त्या नॅन्सी अॅन मिलर च्या शर्मिष्ठादेवी
होळकर बनल्या. ता १७-०३-१९२८ रोजी वडवाई येथे
लग्न झाले. त्या लग्नाकरता महाराष्ट्रातून स्पृश्य-अस्पृश्य मिळून पाचशेवर लोक
नेले होते.
तुकोजीराव होळकर व शर्मिष्ठादेवी
होळकर यांना एकुण चार मुली झाल्या. तुकोजीराव यांनी होळकर घराण्यातील आंतरजातीय
विवाहाची परंपरा पुढे चालू ठेऊन त्यांच्या पहिल्या पत्नी पासून झालेल्या झालेल्या
मुलाचा कुणबी समाजातील मुलीशी लावून दिला तसेच त्याच घरात आपल्या शर्मिष्ठादेवी
यांच्या पासून झालेल्या मुलीचा विवाह लावून दिला.
दुसऱ्या मुलीचा विवाह हा त्यांनी पतियाला येथील शीख राजपुत्राशी आंतरधर्मीय
लावून दिला.
आता नॅन्सी अॅनी मिलर ह्या महाराणी शर्मिष्ठादेवी होळकर बनल्या म्हंटल्या
नंतर आमच्या जातीयवादी बंधू आणि भगिनींना जरा त्याची बदनामी करायची जुनी सवयच आहे.
काय कारण आहे कुणास ठाऊक ह्या आमच्या बांधवाना “होळकर” हे नुसत नाव जरी ऐकले कि कपाळावर आठ्या
निर्माण होतात. मग नेहमी प्रमाणे त्यांच्याबद्दल ही आरोप करायला, अफवा उठवायला ही
मोकळी होतात ही मंडळी... ह्यांच्या अफवा काय तर म्हणे तुकोजीराव व शर्मिष्ठादेवी
यांचा विवाह फार काळ टिकला नाही. आणि लवकरच घटस्फोट
झाला व वापस विदेशी निघून गेल्या...आता काय बोलावे ह्या जातीयवादी बंधू आणि
भगिनीबद्दल...मुळात असेही काहीही झाले नव्हते तुकोजीराव व
शर्मिष्ठादेवी यांचा विवाह शेवटपर्यंत टिकला आणि जन्माने
विदेशी असूनही शर्मिष्ठादेवी यांनी भारतीय संस्कृतीशी एकरूप झाल्या होत्या...शार्मिष्ठादेवी
यांनादेखील तुकोजीराव यांचाशी होणाऱ्या आंतरवांशिक विवाहाच्यावेळी अमेरिकेतील
लोकांचा विरोध पत्कारला, तसेच ख्रिश्चन धर्मियांचा देखील त्यांना विरोध झाला होता.
तो विरोध न जुमानता त्यांनी तुकोजीराव होळकर यांच्याशी विवाह केला ही त्या काळातील
एक क्रांतिकारक घटना होती...
-
सचिन शेंडगे (९८६०३२४३८४)