Tuesday, 24 December 2013

सपाट मैदानी प्रदेशातील गनिमीकावा – मल्हारतंत्र



  सपाट प्रदेशातील गनिमीकावा हे युद्धतंत्र मल्हारराव होळकरांनी विकसित केले होते त्यामुळे मल्हारतंत्र ह्या नावानेही ओळखले जाते. सुभेदार मल्हाररावानी संपुर्ण उत्तर हिंदुस्तान काबीज केला. दिल्लीच्या तख्तावर शेवटपर्यंत वर्चस्व ठेवले. त्यांच्या या सर्वत्र विजयांचे रहस्य म्हनजे त्यांनी विकसीत केलेला मैदानी प्रदेशातील गनिमी कावा हे होय.
 पण तरीही अनेक बुद्धिवंत इतिहासकारच्या मते उत्तर हिदुस्तानातील सपाट मैदानी प्रदेशात गनिमीकावा हे युद्धतंत्र वापरले जाऊ शकत नाही. पण अश्या बुद्धिवंत इतिहासकारांच्या बुद्धीवर कीव करावी तितकी कमीच, गनिमी कावा म्हणजे नुसते डोंगरावरून दगडफेक करणे अशी समजूत असणाऱ्या लोकांची ही गोड समजूत दूर करण्यासाठी प्रसिद्ध इतिहासकार खरे यशवंत वासुदेव यांचे होळकरांच्या गनिमीकाव्या विषयी काय मत आहे हे पुढे देत आहे.

होळकरांचा गनिमीकावा विचित्र होता मैदानात समोरासमोर इंग्रजाशी लढण्याच्या भानगडीत पडत नसे. पहिल्याने घोडेस्वाराच्या लहान लहान टोळ्या दिसू लागत या लहान टोळ्याच्या पाठीशी घोडेस्वाराच्या मोठमोठ्या टोळ्या असत. इंग्रजी फौज चालून आली तर हे घोडदळ पळू लागे. इंग्रजी फौजेची पाठ वळताच हजारो मराठे घोडेस्वार चहूकडून हल्ले करीत आणि पिछाडीवर लांडगेतोड करीत. शत्रूभोवती घिरट्या घाल घालून मराठे संधी सापडेल तेंव्हा शत्रूची कत्तल करीत...

 ही माहिती त्यांनी महाराजा यशवंतराव होळकर यांनी इंग्रजाला उत्तरेत वेगवेगळ्या ठिकाणी १८ वेळा पराभूत केल्यानंतर लिहिली होती. तरी ह्या विशिष्ट मंडळीना ह्यांच्या प्रसिद्ध फेकर पानिपतकारावरच जास्त विश्वास...
 
संदर्भ ग्रंथ ---
यशवंत वासुदेव खरे._ ऐतिहासिक लेखसंग्रह भाग – १५
व तसेच प्रसिद्ध इतिहासकार संजय क्षीरसागर यांची खासी मदत जाहली...


- सचिन शेंडगे (९८६०३२४३८४)
 


        

        

2 comments: