वरील विषयाशी संबधित नाही परंतु मनातील खंत
व्यक्त करावीशी वाटते ती म्हणजे काहीदिवसापासून माझ्यावर खाडे नामक एका खेकड्याने
माझे पाय खेचण्याचे प्रयत्न चालवले आहेत, इतकेच काय तर त्याने माझ्यावर आरोप केले
कि धनगर समाजासाठी व होळकरांसाठी माझ आजपर्यंत contribution
zero आहे म्हणजे कार्य शून्य आहे. हे आरोप माझ्यावर झाल्यानंतर मला आहिल्याबाई
होळकर यांच्या पत्रातील एक वाक्य आठवले त्याचा आशय थोडक्यात असा होता कि “आम्हाकडून कार्य
होतात पण परंतु ती उजेडात काही येत नाही”.
आणि तीच गत माझी झाल्यासारखी वाटते कारण छोटी छोटी कार्य माझ्याकडून झालेली आहेत
ती उजेडात आणणारी कोणी नाही. त्यामुळे एकच पर्याय उरला तो म्हणजे स्वत केलेली जी
काही छोटी कार्य आहेत ती स्वताच उजेडात आणावीत. मी कलेले सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे वाघ्या प्रकरणात मी पुढाकार घेऊन संजय सोनवणी कळविले कि वाघ्यामुळे प्रकरणामुळे
धनगर समाजाचा अपमान होतो पण हा समाज मुका आहे त्यामुळे आपण ब्लॉगच्या स्वरुपात
लिखाण करून जनजागर्ति करावी अशी विनंती केली आणि सोनवणी सरानी संभाजी ब्रिगेडच्या
तावडीतून धनगर समाजाचे अस्मित्चे प्रतिक असणाऱ्या वाघ्याच्या पुतळ्याला वाचविले
तसेच महाराजा तुकोजीराव होळकर III यांचे कार्य
पुढे आणले, तसेच महाराजा यशवंतराव होळकर यांच्यावरील चारित्र्य
लिहिण्यासाठीची कल्पना मी संजय सोनवणी यांना दिली होती व आज त्यांनी लिहिलेले चारित्र्य
किमान महाराष्ट्रातील धनगर समाजापर्यंत पोहचले, तसेच सुभेदार मल्हारराव होळकर
यांच्या जीवनावरील लिहिले गेलेले अतिशय दुर्मीळ पुस्तक इंटरनेटवर उपलब्ध होते ते
त्यांच्या पर्यंत पोहचवले आणि त्याच पुस्तकाचे त्यांनी पुढे प्रकाशन केले व त्याच्या
अनेक प्रती उपलब्ध करून दिल्या, अश्या अनेक छोट्या कल्पना संजय सोनवणी यांना सुचवल्या.
पण खेकड्याच्या पैस्यापुडे आमची कल्पकबुद्धी अंधारात राहिली.
सोनवणी
सरांच्या “प्रकाशात”
आमचे चमकणे लोकांना दिसत नाही म्हणून आह्मी त्यांच्या “प्रकाशापासून” जरा दूर होण्याचा
निर्णय घेतला आहे कारण आम्हीही सोन्यासारख नाही तर किमान चांदी सारख तरी चमकतो हे
माझ्या समाज बांधवाना कळेल.
महाराजा
यशवंतराव होळकर यांचे चारित्र्य समाजापर्यंत पोहचविण्यासाठी यशवंतराव यांच्यावरील अतिशय दुर्मिळ
माहिती जी आजवर यशप्रेमी पर्यंत पोहोचलेली नव्हती ती आज आपल्यापर्यंत पोहचवत आहे. ती म्हणजे महाराजा
यशवंतराव होळकर यांच्यावर वासुदेव वामन खरे लिहिलेले “यशवंतराय महाकाव्य” हे आधुनिक मराठी साहित्य विश्वातील पहिले
महाकाव्य १८८८ साली लिहिले जे कि आजपासून सुमारे सव्वाशे वर्षापूर्वी लिहिले गेले होते. हे काव्य लिहिल्यानंतर त्यांना इंदोर सरकार तर्फे
मोठे इनाम मिळाले होते व तसेच पुढे त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव देखील “यशवंत” ठेवले. पण
शोकांतिका अशी कि जसे यशवंतरावांचा इतिहास काळाच्या पडद्याआड गायब झाला होता अगदी
त्या प्रमाणे त्यांच्यावरील लिहिले गेलेल्या महाकाव्याचीही तीच अवस्था...ह्या
ग्रंथाची केवळ एक प्रत आज उपलब्ध आहेत.
यशवंतराय महाकाव्य – वासुदेव वामन खरे
यशवंतराव होळकरांवर एक काल्पनिक कथानक रचून के.
तीर्थरूपांनी हा काव्यग्रंथ लिहिला आहे. हे काव्य १७२६ क्ष्लोकाचे असून त्याचे
चोवीस वर्ग आहेत. हा काव्यग्रंथ प्रसिद्ध आहे. मुंबई युनि. च्या अभ्यास ग्रंथात
याचा समावेश झालेला आहे. दक्षिणा प्राईस कमिटीने या ग्रंथास मोटे बक्षीस दिले आहे.
या ग्रंथात वीररस हा प्रधानरस असून कथा प्रसंगाने शांत, भयानक, अदभत हास्य आणि
शृंगार या रसाची परिपोष जागोजाग केलेला आहे. महाकाव्य ज्याला म्हणता येईल असा हा
एकच मराठी भाषेतील ग्रंथ होय.
इतिहासात
दडला गेलेला हा महाकाव्य म्हणावा असा ग्रंथ उजेडात आणण्याचे “कार्य” तर मी केले आहे आणि तसेच हे महाकाव्य यशप्रेमीपर्यंत
e book च्या स्वरुपात पोहोचविन्यासाठी मी आजपासूनच पर्यंत सुरु करणार आहे...
-
सचिन शेंडगे ९८६०३२४३८४
No comments:
Post a Comment